Wednesday, August 6, 2008

माझ्या बद्दल थोड -



मी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून (सोलापुर) माहिती तंत्र्द्न्यानचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहे .

माझ्या बद्दल मी किती बोललो तरी कमी आहे। कारण मला मी खुप आवडतो। फ़क्त एकदा माझ्याशी गप्पा मारा ते तुम्हालाही कलुन येइल. मी एकदम बोलका माणुस आहे , मला बडबड करने आवडते ,वाचनाचा तर वेड आहेच त्यामुले मी कित्येक वेळा कोणाशीही कुठल्याही विषयावर बोलत असतो त्याचवेळी मी इतरही अनेक गोष्टी करू शकतो जसे की कार्यव्यवस्था, नियोजन ईत्यादी ।
मला वाटत की माणसाला आयुष्यात दोन मार्ग दिसत असतात. एक असतो कारकिर्दिचा ( जो सगल्याना दिसत असतो .) आणि दूसरा असतो तो धेयाचा. कारकिर्दिचा अंतिम टप्पा हा धेय च असतो हे कित्येकाना दिसून ही पटत नाही. माझा धेय आहे या भारताच्या भूमि साठी च जगाव आणि त्याच्यासाठीच मराव -' पुनरपि मरणं ,पुनरपि जननं या भुमिसाठी.' कधी कधी मी थोडा जास्तच भावनिक होतो जेन्वा या देशात चाललेला गोंधळ बगतो तेंव्हा अस वाटत न की सरल- सरल बन्दूक हातात घ्यावा आणि देशाची वाट लावायला बसनार्याला गोळ्या घालाव्या. आणि अजुन एक म्हणजे मला पूर्ण माहिती असल्याशिवाय बोलायची सवय नाही. आणि अर्धवट माहिती निशि बोलायला आवडत ही नाही .
स्वताची भूमिका स्पष्ट मांडणारे मला अधिक आवडतात। दुसर्यांचे नाव घेउन फस्वनुक करणारे मला अजिबात आवडत नाहीत. जस मी तुम्हाला एखादा निर्णय घेण्यास भाग पाडत नाही कारन ते तुमच खासगी जीवन आहे तसेच तुम्ही मला एखादा निर्णय घेण्यास भाग पाडू शकत नाही कारन माझ ते खासगी जीवन आहे.
मी एक असा हिंदुत्ववादी आहे ज्याला सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या मान्य आहे.

"आसिंधू सिन्धु पर्यन्त: पित्रभू पुन्यभूश्चैव
यस्य भारत भूमिका सवै हिन्दूरिती स्मृता: "


मी एक असा आंबेडकर वादी आहे ज्याला त्यांची( आंबेकर यांची ) सामजिक मते मान्य आहेत.
अजुन बरच काही सांगायच आहे माझ्याबद्दल आणि ते मी असच सांगत राहीन ।